![]() |
दै. लोकसत्ता |
आळंदीच्या मुख्याधिकार्याना स्थानिक नगरसेवकानी मारहाण केल्याची दुर्दैवी बातमी व्रुत्तपत्रात वाचनात आली. प्रशासकीय अधिकार्याना त्यांच्या कर्तव्याची अशी बक्षिशी मिळणार असेल तर कुणीच अधिकारी आपले काम चोखपणे बजाऊ शकणार नाही. अधिकार्याना आपले काम व्यवस्थित करण्यासाठी समाजातील सर्व घटकानी तशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. शासकीय कामात अडथळे आणून अधिकार्याना त्रास देण्यात येत असेल तर ही गंभीर बाब मानली पाहिजे. सुभाष माने, श्रीकर परदेशी, महेश झगडे या अधिकार्यांच्या होणार्या आकस्मिक
बदल्या, त्यांच्या धोरणाना संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून होणारा विरोध या बाबी अलीकडे ठळकपणे नजरेस आल्या आहेत. हे कमी कि काय म्हणून प्रशासकीय अधिकार्याना काळे फासणे, मारहाण करणे अशा घटनाही घडू लागल्या आहेत. प्रशासनात कामचुकारपणा वाढीस लागला असताना काही अधिकारी जनहिताचा विचार करुन प्रामाणिकपणे आपले काम करत असतात. अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे सोडून त्यानाच त्रास देण्यात येत असेल तर सरकारी पातळीवर कडक पावले उचलून उपाययोजना करावी. अधिकार्यांशी असभ्य वर्तन करणार्याना कठोर शासन झाले पाहिजे.
रेश्मा राणे, मलकापूर, जि. बुलढाणा.
अतिशय सुंदर लेख आहे. प्रशासकीय अधिकार्यांच्या पाठीशी आपण सर्वानी उभे रहायला हवे. भ्रष्ट, गुंड प्रव्रुत्तीना आपण वेळीच लगाम घातला पाहीजे. आपल्या प्रयत्नांबद्दल आपले अभिनंदन....
ReplyDelete