स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज

Sunday 8 March 2015


जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची एकूणच परिस्थिती आणि त्यांचे समाजातील स्थान याबद्दल चर्चा चालू आहे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, महिलांची उपेक्षा, समाजातील त्यांचे निम्न स्थान यावर खरेतर चर्चा होणे अपेक्षित आहे. प्राचीन काळापासून महिलाना दुय्यम दर्जा मिळाला आहे. समाजात नेहमी जात, धर्म आणि लिंग याआधारे भेदभाव केला जातो. लिंगाधारित भेदभावामूळे महिलांचे समाजातील स्थान खूपच रसातळाला गेले आहे. समाजात पावलोपावली स्त्रीची खूप उपेक्षा होत आहे. पुरुषांचा स्त्रीकडे पाहाण्याचा द्रुष्टीकोन निर्मळ नाही हे आपण अनुभवावरुन सांगू शकतो. पुरुषप्रधान संस्क्रुतीत स्त्रीची होणारी कुचंबना नवीन नाही. तरीही जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, ताराराणी, लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी अशा अनेक महिलानी विषमतावादी परिस्थितीवर मात करुन उज्ज्वल इतिहास निर्माण केला आहे.



स्त्रिया सक्षम व्हायच्या असतील तर त्यानी त्यांच्या मनातील न्युनगंड काढून टाकला पाहिजे. स्त्री ही मूळातच खूप ताकदवान, बुद्धिमान, सशक्त, सोशिक असते. निसर्गाने स्त्रीला खूप प्रबळ बनवले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये गुणवत्ता नक्कीच जास्त आहे. परंतु संधीच्या अभावी ती उपेक्षित राहते. तरीही विषमतावादी वातावरणात स्त्री आपले स्थान बळकट करत आहे ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री खांबीरपणे उभी असते. हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. स्त्री तिच्या आयुष्यात अनेक भूमिका पार पाडत असते. कधी ती आई असते, कधी बायको, बहिण तर कधी मैत्रीण. परंतु या सर्व भूमिकामध्ये ती पुरुषांच्या मागे एक प्रेरणा बनून उभी असते. स्त्रिया प्रगतीच्या प्रवाहात मागे राहिल्या तर त्याचे अनिष्ठ परिणाम समाजावर दिसून येतील. स्त्रियाना समजून घेण्यात पुरुष कमी पडत आहेत. स्त्रीच्या भावना, विचार निर्मळ मनाने समजून घेतले पाहिजे. अशा व्यक्ती संख्येने फार कमी आहेत हीच शोकांतिका आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे, तिच्याबद्दल सर्वानी आदर बाळगावा अशी स्त्रीची अपेक्षा असते. यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच समतावादी, स्त्रीप्रधान संस्क्रुतीची वाढ होईल.

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वाना खूप खूप शुभेच्छा.....

-रेश्मा राणे, मलकापूर, जि. बुलढाणा.

7 comments

  1. Very good article....keep it up...i agree with u...tumche vichar changle ahet....asech lihit raha....

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लेख आहे. महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात आपण कमी पडत आहोत. मुलीना महिलाना समाजात मान सन्मान दिला जात नाही हे खरे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत. आपण मांडलेले विचार अतिशय स्तुत्य आहेत. भरपूर अभ्यास करा आणि असेच लिहित रहा. आपल्यामध्ये talent आहे. त्याचा वापर समाजाच्या हितासाठी होऊ द्या....समाजात असेही संकुचित विचाराचे लोक असतात कि ते मुलीना आपल्या पायाची दासी बनवू इच्चितात. kअशा लोकाना आपल्या विचारातून उत्तर मिळेल.

    ReplyDelete
  3. Reshma madam tumhi khup chhan lihita.

    ReplyDelete

 

Followers

Followers

Search This Blog

Blogroll

Most Reading

Worldwide Visiters

Flag Counter

Visitors Map