सर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा ?

Friday 27 March 2015

'थप्पडीचे डोहाळे' हा अग्रलेख (दै. लोकसत्ता, 18 मार्च ) आणि त्यावरील प्रतिक्रिया ( 19 मार्च ) वाचली. अग्रलेखात मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडली आहे ती अगदी योग्य आहे. परंतू मराठा समाज हे वास्तव स्विकारायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात मराठा समाजाची सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती अत्यंत वेगाने झाली. सामाजिकद्रुष्ट्या हा समाज बलदंड असल्याने आणि या समाजाची लोकसंख्याही लक्षणीय असल्याने सर्व क्षेत्रात या समाजाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. राजकारणात मराठा समाजाला प्रमाणापेक्षा जास्त

प्रतिनिधित्व आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व महत्वाची खाती ही मराठ्यांच्याच ताब्यात असतात. (सध्याचा अपवाद ). सहकार क्षेत्रावर पुर्णपणे मराठा समाजाचे वर्चस्व आहे. साखर कारखाने, दुधसंस्था, सूतगिरण्या अशा प्रकारच्या शेकडो संस्था मराठ्यांच्या ताब्यात आहेत. राज्यातील बहुतांशी जमिनीची मालकीही त्यांच्याकडेच आहे. राज्यातील अनेक शिक्षणसंस्था/विद्यापीठे मराठा समाजातील व्यक्तींच्या मालकीच्या आहेत. समाजात ब्राह्मणांखालोखाल मराठा समाजाला मान-सन्मान, प्रतिष्ठा आहे. मराठेही (यात गरीब मराठेही आले) स्वत:ला शहाण्णव कुळी, पाटील, देशमुख समजतात. समाजात मिरवायला जातीचे मोठेपण पाहिजे आणि आरक्षणासाठी मात्र मागासपणा सिद्ध करण्याचा खटाटोप ही दुटप्पी भूमिका आहे. अनेकदा निवडणूकांमध्ये मराठा उमेदवार खोटे कुणबी प्रमाणपत्र सादर करुन निवडणूका जिंकतात. अशा प्रकरणात न्यायालयाने सदर कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवली आहेत. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणही हवे आणि खोट्या दाखल्यांच्या आधारे ओबीसींच्या जागाही हव्यात हा कोणता न्याय आहे ? अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीत मराठा समाज सर्वच क्षेत्रात पुढारलेला असल्याने त्याना आरक्षणाची गरज नाही. तरीही मागासवर्ग आयोगाच्या सूचना/शिफारशी डावलून आणि घटनाबाह्य राणे समितीचा पोकळ आधार घेऊन सरकार मराठा आरक्षणाचे घोडे पुढे दामटणार असेल तर याचे गंभीर परिणाम त्याना भोगावे लागतील.

22 comments

  1. आदरणीय रेश्मा राणे,

    लेखाबद्दल आपले अभिनन्दन. मराठा आरक्षणावरून सर्वत्र वाद-प्रतिवाद चालू आहेत. मराठा आरक्षणाला समाजातील अनेक थरातून विरोध होताना दिसत आहे. याला अनेक कारणे आहेत. आपण यापैकी काही मुद्द्यांचा परामर्श आपल्या लेखात घेतला आहेच. मराठा समाज सधन आहे, त्यांच्याकडे सर्व सत्तास्थाने आहेत हेही खरे आहे. परंतु अनेक मराठे विशेषत शेतकरी, मजूर वर्ग खूप हलाखीच्या स्थितीत जीवन जगात आहे. सर्व मराठा समाजाला नाही तरी निदान गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे असे मला वाटते. आपण मराठा समाजाबद्दल जे लिहिले आहे ते खरे आहे आणि हे वास्तव मी मान्य करतो. परंतु समाजातील काही लोकांच्या हातीच हि सत्तास्थाने एकवटली आहेत. बाकीचे मराठे फक्त नावाचेच मराठे आहेत. आणि ते खूप गरीब परिस्थितीत जगात आहेत. त्यामुळे किमान त्यांना काही सवलती मिळाव्यात असे मला वाटते. शाहू महाराजांनी आरक्षण देताना समाजातील मागास घटकांसोबत मराठा समाजाचाही समावेश केला होता हि गोष्ट नजरेआड करून चालणार नाही.

    आपण अतिशय छान लेख लिहिला आहे. आपली मांडणी करण्याची शैली खूप छान आहे. मी आपला ब्लॉग नेहमी वाचत असतो. यापुढेही आपण असेच लिहित राहावे. चर्चा, वाद-प्रतिवाद चालत राहतीलच. यापुढेही आपल्यामध्ये निखळ चर्चा होत राहील.

    धन्यवाद.
    पुरुषोत्तम चव्हाण, कोल्हापूर.
    www.puruchavan.in

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लेख. तू छान विवेचन केले आहेस. कदाचित अनेकाना हे पटणार नाही. परंतू उघड्या डोळ्यानी याबद्दल विचार केल्यास तुझ्या म्हणण्यातील सत्यता नक्कीच पटेल. मराठा आरक्षण या वादग्रस्त मुद्द्यावर लिहितानाही तू खूप सयमी मांडणी केली आहेस. मराठा समाजाबद्दल कुठेही वैय्यक्तिक टिकाटीपण्णी नाही याबद्दल तुझे कौतुकच करायला हवे. खरेतर यावर खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक आहे.

    पुरुषोत्तम चव्हाणने दिलेली प्रतिक्रियाही चांगली आहे. मराठा आरक्षण योग्य नसले तरी गरीब मराठ्यांचा विचार व्हायला हवा. त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायला हवे.

    ReplyDelete
  3. " समाजात मिरवायला जातीचे मोठेपण पाहिजे आणि आरक्षणासाठी मात्र मागासपणा सिद्ध करण्याचा खटाटोप ही दुटप्पी भूमिका आहे. "

    हे केवळ मराठा समाजाच्याच बाबतीत खरे आहे काय? इतर सामाजिक घटक गरीब असूनही जातीचा मोठेपणा समाजात मिरवतच नाहीत काय? मग मराठ्यांनाच वेगळा न्याय का? तसे असेल तर यापुढे ज्या सामाजिक घटकांना आरक्षण मिळाले आहे त्यांनी आपल्या जातीच्या महानतेचे ढोल वाजवणे बंद करावे. जातीय परिषदा आणि मेळावे घेणे थांबवावे. एकाच कुटुंबाने पिढ्यानपिढ्या आरक्षण ओरबाडणे बंद करावे. केवळ मराठा समाजाने समतेच्या मार्गावर चालायचे आणि इतरांनी मात्र गोचीडीसारखे आपापल्या जातींनाच चिकटून बसायचे अशी अपेक्षा करणाऱ्यांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतील.

    ReplyDelete
  4. राजेश28 March 2015 at 01:29

    मराठा समाज सर्वांपेक्षा श्रीमंत आहे. गावगाड्यात सर्व प्रतिष्ठा मराठा समाजाला आहे. मराठे जात सोडायला तयार आहेत का ?

    ReplyDelete
  5. obc, sc, st che reservation mule tyanchi pragati zali hech marathyanche dukhane ahe. aata aata paryant te reservation policy la virodh karat hote . mag aata kashala pahije reservation. maratha mhanun milnare jatiche fayde obc, sc, st la dya ani khushal tyanche reservation ghya.

    ReplyDelete
  6. " मराठे जात सोडायला तयार आहेत का ?"

    मराठ्यांनी जात सोडण्याची इतकी घाई का बरे? आधी स्वत: जात सोडून दाखवा ना! ओबीसी मधील किती जातींमध्ये आंतरजातीय विवाह होतात? मराठा समाज तर बोलून चालून जातीयवादी आहेच ना! मग इतरांनी पुरोगामी व्हायला काय हरकत आहे? एकीकडे आपापल्या जातीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे इतरांनी जात सोडावी म्हणून शंख करायचा ? इतर जाती जर जात सोडायला तयार नाहीत तर केवळ मराठ्यांनी जात सोडून संपूर्ण समाज पुरोगामी होणार आहे काय? आणि मराठ्यांची श्रीमंती केवळ आरक्षण मागितल्यावरच कशी दिसायला लागली? एवढी वर्षे काय डोळे फुटले होते ?
    श्रीमंतांना जात नसते आणि गरिबांनाही जात नसते. इतर जातींमधील श्रीमंत लोक त्यांच्या जातिबांधवांना फुटक्या कवडीची तरी मदत करत आहेत का? तसेच चित्र मराठा समाजातही आहे.
    "सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख" हे जसे मराठ्यांना लागू पडते तसेच इतर सर्वच जातींना लागू पडते. स्वत: डबक्यातच राहून इतरांना कूपमंडूक म्हणून हिणवणे हे महान भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

    ReplyDelete
  7. Good article reshma

    ReplyDelete
  8. Maratha, obc sahit sarvanich samatechi bhumika uchalun dharavi. Reshma madam yavar ekhade article lihave hi vinanti.

    ReplyDelete
  9. Nice work reshma...

    ReplyDelete
  10. chhan lekh ahe. I totally agree with you.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. मला आश्चर्य वाटते कि ,येथे प्रतीक्रियेखाली संपादनाचा (Edit ) पर्याय नाही.मला माझी प्रतिक्रिया संपादित करायची होती त्या प्रयत्नात मला माझी प्रतिक्रिया नाईलाजाने Delet करावी लागली.

      Delete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. माननीय PURUSHOTTAM CHAVAN & प्रकाश पोळ,आज सर्वच जातींमध्ये काही लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत,तर काही लोक सधन श्रीमंत आहेत. ह्याला अगदी ब्राह्मण,मारवाडी,कोमटी समाज सुद्धा अपवाद नाहीत आणि ज्या धर्माला अल्पसंख्याक म्हणून कि मागासलेले म्हणून आरक्षण दिले आहे त्या जैन धर्मातील बहुसंख्य लोक श्रीमंत व्यापारी,उद्योगपती,कारखानदार आहेत..आता बोला...म्हणून एका जातीतीत काही लोक आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत म्हणून त्या संपूर्ण जातीला आरक्षण देणे किवा दुसर्या जातीतील सर्व लोक श्रीमंत आहेत असे मानून (जे कि पूर्ण सत्य नाही) त्या जातीतील गरीबांना आरक्षण नाकारणे हा शुद्ध अन्याय आहे आणि हा दूर केला गेला पाहिजे.म्हणून आरक्षणाचा निकष जात किवा धर्म न मानता तो आर्थिक मागासलेपण असायला हवा, आणि काटेकोरपणे सर्व जाती,धर्मातील गरीब,आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि आरक्षणरूपी मदतीच्या हाताची गरज असणर्या लोकांना शोधून त्यांना असा मदतीचा हात द्यायलाच हवा .....आणि हो आज जसे आपल्याला दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या यादीत काही धनदांडग्या लोकांची नावेही समाविष्ट केलेली दिसतात तसे ह्या बाबतीत होवू नये .....जो खरेच गरीब आहे त्याला आरक्षण मिळावे मग त्याची जात किवा धर्म कोणताही असो....शिवाय एकीकडे "जाती तोडो समाज जोडो म्हणायचे" आणि दुसरीकडे जातीच्या आधारावरच आरक्षण देवून जातसंस्था अधिक पक्की करायची हे विसंगती नाही का? शिवाय स्वतः आरक्षणाची घटनेमध्ये तरतूद करण्यार्या बाबासाहेब आबेडकर ह्यांनीसुद्धा हे आरक्षण ठराविक काळापुरते (१० वर्षे फक्त) लागू असावे असे म्हटले होते ,पण हे राजकारणी लोक आपल्या मतपेट्याच्या स्वार्थी राजकारणापोटी दर १० वर्षांनी आरक्षणाला मुदतवाढ देत आहेत.आता काही लोक म्हणतील कि हजारो वर्षे झालेला अन्याय ६५ वर्षात कसा भरून निघणार मग मी त्यांना विचारतो कि विरद्ध बाजूचा समाज पूर्णपणे मागासलेला होईपर्यंत त्यांचा अन्याय भरून निघणार नाही कि काय ? शिवाय दोन पिढ्या (आजोबा आणि मुलगा) ह्यांनी शिक्षण,नोकरी,नोकरीतील पदोन्नती आणि राजकीय आरक्षणाचा लाभ घेतल्यावर (वडील प्राध्यापक आणि मुलगा डॉक्टर झाले आहेत ) तर मग तरीदेखील त्यांचा नातू मागासलेला कसा? आणि तो नातू मागासलेला म्हणून त्याच आरक्षणाचा लाभ घेत असेल तर ह्याला फसवणूक म्हणू नये का? आता काही लोक असेही म्हणतील कि ६५ वर्षे आरक्षण घेवून ते लोक ब्राह्मण झाले का ? मग मी त्यांना विचारतो कि त्यांचा मुख्य उद्देश काय आहे? ब्राह्मण बनणे कि आर्थिकदृष्ट्या उन्नत होणे आणि शिवाय आज ब्राह्मण लोक सुखी ,पूर्वी सारखे शक्तिशाली,प्रभावशाली आहेत का ?

    ReplyDelete
    Replies
    1. JAYWARDHAN MASLEKAR ह्यांच्या वरील मताशी १०० % सहमत आहे.आम्ही महाराष्ट्रात बहुसंख्य आहोत म्हणून मतपेटीच्या दबावतंत्राचा वापर करून स्वतःला नसतानाही मागासलेले घोषित करून नियमबाह्य आरक्षण पदरात पडून घेतोलच हा दुराग्रह किवा अट्टाहास जितका चुकीचा आहे तितकाच खापर पणजोबा,पणजोबा मागासलेले होते म्हणून (आजोबा आणि वडिलांनी आरक्षणाचा लाभ घेतल्या नंतरही) आज वर्तमानात मी त्यांचा खापरनातूही मागासलेला आहे असे मानून व म्हणून त्या खापरनातवाने आरक्षण घेणे हा प्रकार चुकीचाच आहे.हे दोन्हीही प्रकार निकोप समाज स्वास्थ्यासाठी घातक आणि चुकीचे आहेत. हा प्रश्न नीतिमत्तेचा आहे. कॅनेडा,सिंगापूर इथे गरीब आणि आर्थिकदृष्यामागासलेल्यांसाठी बांधलेल्या घरांमध्ये फक्त गरीब आणि आर्थिकदृष्या मागासलेले लोकच राहतात, त्यांनाच तशी घरे सरकारकडून नाममात्र दारात उपलब्ध करून दिल्या जातात .तेथे कोणी श्रीमंत व्यक्ती राहत नाही.इथे आपल्या भारतात मात्र लोकांची मानसिकता अशी आहे कि " अधिकाधिक भात फक्त माझ्याच ताटामध्ये वाढल्या जावा मग दुसरा उपाशी राहतोय तर राहू खुशाल दे,मला त्याच्याशी काय देणे घेणे ?"

      Delete
  14. फारच छान लेख आहे रेश्मा तुमचा.त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !!! शिवाय JAYWARDHAN MASLEKAR ह्यांची प्रतिक्रियाही खूप अभ्यासपूर्ण आहे. मराठा जातीतील लोकांनी आरक्षण मागणे म्हणजे "मोठ्या बैलाने आपली शिंगे मोडून वासरात शिरणे" असा प्रकार आहे. मराठा लोक मागासलेले आहेत असे म्हणणे हा ह्या शतकातील सर्वातमोठा विनोद आहे .........

    ReplyDelete
  15. Ekandareet saglya goshtincha vichar karu pahta aapan konala aarakshanachi garaj aahe athava konava naahi hi baab sadhya tari baajula theuu ... Ya thikani ekach bolushi vatata ki ji kaahi moth-mothi khaati maratha samajachya haati aahet mag ti kontihi aso' whatever ... je kaahi asel te tyanchya vayakteek pratishtha aani paarivarik kshamtevar avalamboon aahe ...

    aani aata raahila prshna shikshna babat chya aarakshnacha tar jya thikaani kalaa gunn na paahta mhanjech vidyarthyanchi boudhikk kshamata na paahta tyanna aarakshna sarkhya goshtinchaa vichar karun jar tyanna admission dile jaat asel tar ekhadyachya boudhhik kshamtechi kahich kimmat naahi kaa ...?

    Aani mala tari vatata ki pratyekachi kshaikshaneek aani boudhhik paatali hi kadhihi konachya jaativar avalamboon naste aani tari sudhha aapan kshikshanasarkhya mahatvachya vishyala sudha aarakshana sarkhya gambheerr vishyaat jakhdunn thevtoy he yogya aahe ka ...?

    Aani mhanunach aamhala tari vatata kshaikshanik kshetraat aajkal jaativarun kinvaa aarakshana sarkhya vishyavarun ekhadyachi boudhhiik kshamta tharavli jaatey hi khup chukichi baab aahe' he badlaayla hav ....

    Jyachi jyapramane kshaikshaneek paatali kinva boushik kshamata asel tyanusarachh tyachi jaaga tharaavi' jaativarunn naahi ...

    Ekandareet kaay tar aarakshan konala bhetu kinva na bhetuu ... mahatvaachi khati konakade hoti kinva konakade aahet he hi jaadya pan ekach sangushi vatata ki kshaikshaneek kshetrasarkhya vidyarrjanachya pavitra kshetraat tari yaa goshti na ghusaddtaa tithe phakt aani phakt kshikshnaala aani boudhikk kshamtelach mahatva dila jaav evdhach...

    ReplyDelete
  16. हे अगदी बरोबर आहे.
    शैक्षणिक सारख्या महत्वाच्या क्षेत्रात एखाद्याची बौध्दिक क्षमता न पाहता त्यांच्या जातीला बघुन त्यांना प्राधान्य दिले जाते हे अंत्यत चुकीच आहे.
    एखादयाच्या जातीला महत्व दयाचे का त्याच्या बौध्दिक क्षमतेला ? आरक्षणामुऴे एखाद्याच्या बौध्दिक क्षमतेला काहीच किंमत राहत नाही .
    यामुळे एखादया हुक्षार गुणवान विद्याथ्यांवर अन्याय होतो . हे खुप चुकीचे आहे हे बदले पाहिजेल

    ReplyDelete
  17. हे अगदी बरोबर आहे.
    शैक्षणिक सारख्या महत्वाच्या क्षेत्रात एखाद्याची बौध्दिक क्षमता न पाहता त्यांच्या जातीला बघुन त्यांना प्राधान्य दिले जाते हे अंत्यत चुकीच आहे.
    एखादयाच्या जातीला महत्व दयाचे का त्याच्या बौध्दिक क्षमतेला ? आरक्षणामुऴे एखाद्याच्या बौध्दिक क्षमतेला काहीच किंमत राहत नाही .
    यामुळे एखादया हुक्षार गुणवान विद्याथ्यांवर अन्याय होतो . हे खुप चुकीचे आहे हे बदले पाहिजेल

    ReplyDelete
  18. missal pav khanar ka?

    ReplyDelete
  19. सर्वच समाजाचे असेच आहे ओबीसी आणि दलित समाजाला एकीकडे सवर्ण मुलीशी लग्न करण्याची इच्छा असते कारण काय तर सर्व समान आहे मात्र आरक्षणाची वेळ येते तेंव्हा ..एकच कारण सांगतात आम्ही मागास आहोत.कसं व्हायचं ?

    ReplyDelete

 

Followers

Followers

Search This Blog

Blogroll

Most Reading

Worldwide Visiters

Flag Counter

Visitors Map